‘या’ जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींसाठी मतदारांची यादी तयार

ग्रामपंचायत

सोलापूर – छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 658 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर कालावधीत पूर्ण होत आहे. ऑक्‍टोंबरपर्यंत 133 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे तर नोव्हेंबरमध्ये 519 आणि डिसेंबरमध्ये 6 ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण होत आहे. त्यामुळे या मुदत संपलेल्या 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता होणार आहेत. तसेच या निवडणुका डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

या निवडणुका डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतींची प्रारूप मतदार यादी एक डिसेंबररोजी प्रसिद्ध झाली आहे. तसेच त्या यादीमध्ये ७ डिसेंबरपर्यंत तक्रारी व हरकती मागवण्यात येतील आणि त्यानंतर १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल. तसेच या यादीमध्ये नाव आहे का? नावामध्ये काही बदल वा दुरुस्ती हवी असल्यास ती आता करता येणार आहे. याशिवाय ज्या प्रभागात राहता, त्या ठिकाणी नाव आहे का? याची देखील तपासणी करता येणार आहे. तसेच यादीमध्ये दरम्यान, काही बदल करायचा असल्यास ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे हरकत नोंदवता येणार आहे.  

महत्वाच्या बातम्या –