कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रभागनिहाय तपासणी कॅम्पचे आयोजन करावे – दादाजी भुसे

दादाजी भुसे

कोरोनामुक्तीकडे मालेगाव शहराची यशस्वी वाटचाल सुरू असतांना कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी नागरिकांचे प्रभागनिहाय तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी काल दिल्या.

राज्यातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी व्हॅनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

उपविभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, डॉ.हितेश महाले, डॉ.सपना ठाकरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुण्यातील मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून बंद राहणार

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, या तपासणी कॅम्पमध्ये प्रामुख्याने नागरिकांमध्ये कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिकार क्षमता चाचणी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात यावी. वयोवृद्धांसह लहान मुलांची यात प्राधान्याने चाचणी करून त्यांच्यावर आरोग्य प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देत ही मोहीम येत्या सोमवार पासून कार्यान्वित करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

खरीप हंगामासाठी महाबीजने नागपूरसाठी बियाणांचा पुरवठा करावा- डॉ.नितीन राऊत

पावसाळा सुरू झाल्यानंतर साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतो. यासाठी महानगरपालिका प्रशासनासह आरोग्य प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना प्रभाविपणे राबविण्याचे आदेश त्यांनी दिले. कोरोना विषाणूमुळे प्रभावित झालेल्या दाखल रुग्णांची व आवश्यक त्या सुविधांची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.

महत्वाच्या बातम्या –

सर्व शासकीय यंत्रणांनी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करावे – विकास खारगे

कोरोना’ संकट टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी – बाळासाहेब थोरात