राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा…

पुणे – राज्यात मागील काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. उत्तर भारतात मॉन्सूनचा प्रवास मंदावला असताना राज्यातील काही भागांत पाऊस पडत  आहे. त्यात मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर राज्यात पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच मध्य प्रदेशच्या वायव्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय होत असल्यामुळे राज्यात मागील ४ ते ५ दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.

तर राज्यात आज बुधवार (ता. ३०) अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, बुलडाणा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –