राज्यातील ‘या’ सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

पाऊस

पुणे – राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसनं हजेरी लावली आहे. यातच आता पुण्यासाहित राज्यातील सात जिल्ह्यात येत्या तीन तासांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

पुण्याच्या दक्षिण भागात पावसाचे दाट ढग साचले असल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधता बाळगण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

दक्षिण कोकण ते विदर्भापर्यंत असलेल्या चक्रिय स्थितीमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा प्रभावामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

19 फेब्रुवारी पर्यंत पावसाची शक्यता कायम असून, पुण्यासाहित नाशिक, धूळे, सोलापूर, नंदूरबार, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा विभागाने दिला आहे.

येत्या शुक्रवारी आकाश अंशत: ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर शहर आणि परिसरात हवामान कोरडं राहिल. यामुळं पुणेकरांनी आणि घाटमाथ्यावरूल गावांनी काळजी घेत आपल्या शेतमालाचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –