औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट  

पाणीटंचाईचे भीषण संकट  

औरंगाबाद जिल्ह्यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टंचाईग्रस्तांची तहान भागविण्यासाठी प्रशासनातर्फे ११७० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

भूजलाची खालावलेल्या पातळीमुळे जिल्ह्यातील पाणीसंकट अधिकच तीव्र आहे. मागील वर्षी पावसाळ्यात अपेक्षेच्या तुलनेत जिल्ह्यात ६० टक्‍केच पाउस पडला. त्यानंतर परतीच्या पावसानेही जिल्ह्यात दांडी मारली. शिवाय यंदा जून अर्धा लोटला. तरीही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीसंकट दिवसेंदिवस भीषण होत आहे.

Loading...

जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. पैठण तालुक्‍यातील जायकवाडी मृत साठ्यात आहे. टॅंकरसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. या तालुक्‍यातील १४५ गावे, ४१ वाड्यांना १८२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ३० विहिरींचे टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे.

औरंगाबाद तालुक्‍यातील १३७ गावे, ४५ वाड्यांत पाणीटंचाई आहे. या गाव-वाड्यांमधील ४ लाख ६ हजार ३७२ लोकांसाठी १९४ टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील १६ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. वैजापूर तालुक्‍यातील १२७ गावे, १९ वाड्यांसाठी १८८ टॅंकर आहेत. ११२ विहिरी अधिग्रहित आहेत. पैठण तालुक्‍यातील १०० गावे, ३१ वाड्यांची तहान टॅंकरशिवाय भागत नाही. त्यासाठी १३८ टॅंकर सुरू आहेत. ७ विहिरी अधिग्रहित आहेत.

पाणीटंचाईचे भीषण संकट  

सिल्लोड तालुक्‍यातील ९६ गावे, ९० वाड्यांत भीषण जलसंकट आहे. त्या ठिकाणी १९४ टॅंकर सुरू आहेत. १०८ विहिरी अधिग्रहित आहेत. फुलंब्री तालुक्‍यातील ७२ गावे, २ वाड्यांसाठी १२२ टॅंकर सुरू आहेत.

कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…

चिकू लागवडीचे तंत्र

Loading...