छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत – नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

नवी-दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे. सर्वत्र शिवरायांना वंदन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही मोदी म्हणाले आहेत.

यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे .सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, असे मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –