राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा त्यासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. अशात रेमडेसिविर, ऑक्सिजन याचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवत आहे. अशात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी कळकळीची मागणी केली आहे.

राज्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे त्यामुळे राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा त्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे. अस आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. तर राज्याला रोज २६ हजार रेमडेसीव्हीर मिळणार आहेत त्यामुळे रोज १० हजार रेमडजेसीव्हीरची कमतरता भासणार आहे. केंद्राच्या निर्णयामुळे राज्यासमोर अडचण निर्माण झाली आहे. लवकरात लवकर रेमडेसीव्हीरबाबत तोडगा काढणे गरजेचं असल्याच सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत प्रश्न सोडवावा अस टोपे म्हणाले आहेत.

दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी पडून दिली जाणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही राज्याविषयी आकस नाही. पण भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या –