‘भारताला सर्वात पुढे घेऊन जायचं आहे’, पेट्रोल -डिझेल ऐवजी,पर्यायी इंधनावर नितीन गडकरींचे मोठे विधान!

नितीन गडकरी

पुणे –        वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या(Vasant Dada Sugar Institute) वतीने राज्यस्तरीय साखर परिषद 2022 च्या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहून यावर महत्वाचे भाष्य केले आहे.

“पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधन शोधले जात आहे. पेट्रोल, डिझेल(Petrol-diesel) संपणार असून ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. येणाऱ्या काळात संशोधन आणि तंत्रज्ञान गरजेचं आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात येणाऱ्या काळात भारताला सर्वात पुढे घेऊन जायचं आहे. महाराष्ट्रात इथेनॉल निर्मिती करणारी अर्थव्यवस्था तयार केली पाहिजे”, असे मत नितीन गडकरी यांनी  व्यक्त केले आहे.

तसेच पुढे बोलताना म्हणाले, “इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल. फ्लेक्स इंजिनमध्ये १०० टक्के पेट्रोल ऐवजी १०० टक्के इथेनॉल वापरता येईल. त्यासाठी इंजिन कंपनीला सांगतोय. पुण्यातील दुचाकी आणि रिक्षा इथेनॉलवर चालवावेत. मी इथेनॉल पंप टाकायला सांगतो. पुण्यात किती प्रदूषण आहे. त्यामूळे महाराष्ट्रात अजित पवार यांनी पुढाकार घ्यावा. येणाऱ्या काळात पुण्यात इथेनॉलचा वापर सुरु करावा,” असे आवाहन गडकरी यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –