हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

हवामान

मुंबई –  हवामान (Weather)  विभागाच्या अंदाजानुसार आज विदर्भात जोरदार  पावसाचा   इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर राज्यात अनेक भागात मागील काही दिवसापासून जोरदार पावसासह गारपीटीने हजेरी लावली आहे. थंडी च्या दिवसात पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.

राज्याच्या काही भागांत सकाळी धुक्यासह दुपारी ढगाळ हवामान पहावयास मिळत आहे. राज्यात शनिवारी , रविवारी , सोमवारी आणि बुधवारी  अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे विदर्भात बर्‍याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसह नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या –