हवामान अंदाज – ‘या’ भागांमध्ये 2 ते 4 फेब्रुवारीला पावसाची शक्यता

हवामान अंदाज

दिल्ली –  हवामान अंदाजानुसार (Weather forecast) आजपासून उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील थंडीची लाट  हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, तर उत्तर-पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारतात 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. जम्मूकाश्मीर , दिल्ली , उत्तर प्रदेश या भागांमध्ये 2 ते 4 फेब्रुवारीला पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान (Weather) विभागाने दिली आहे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड या भागात तीव्र थंडीची शक्यता सांगण्यात आली आहे. तर ही थंडी हळूहळू  कमी होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. हा संपूर्ण आठवड्यात राजधानी दिल्लीत पाऊस पडणार नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.  तर त राजधानी दिल्लीत वाऱ्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार संपूर्ण आठवडाभर हवामान स्वच्छ असल्याने सकाळ आणि संध्याकाळी थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर येत्या 3 फेब्रुवारीला दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  हलक्या पावसाच्या शक्यतेसह आकाश अंशतः ढगाळ राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 20 आणि 10 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –