मुंबई – हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाडा, विदर्भात पावसासह गारपीटीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तविली आहे. राज्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात आज अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे.
राज्यात शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे विदर्भात बर्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांसह नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे नोंदविले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये २ दिवस जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान
- विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड
- तीळगुळ खा आणि आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे फक्त एका क्लीकवर…..
- महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – अशोक चव्हाण