हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पाऊस कोसळणार

पाऊस

मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून आता पुन्हा एकदा पावसाचं दमदार कमबॅक होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  हवामान विभागाने  दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आता राज्यात तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे 3 दिवस वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची  शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

तर राज्यात आजपासून ते  15 नोव्हेंबर वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची  शक्यता आहे. तर राज्यातील  कोकण, मध्य महाराष्ट्र आणी मराठवाडा या भागांमध्ये . वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

तर उद्या राज्यातील  सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी,  सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या –