हवामान अंदाज : महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, तापमान घटणार

हवामान अंदाज

पूर्व भारतात, किनारपट्टीच्या ओडिशामधील एक किंवा दोन ठिकाणी कॉन्फ्लुएन्स झोनमुळे हलका पाऊस पडेल. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे हवामान हे कोरडे राहील. आसाममध्ये चक्रवाती परिस्थिती कायम असल्यामुळे आता पाऊस वाढणार आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि नागालँड याठिकाणी  हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तिथे हिमवृष्टीही होऊ शकते.

त्याचप्रमाणे उत्तर भारतातील हवामान हे कोरडे झाले आहे. आता, उत्तर-पश्चिमी वारे उत्तरेकडील मैदानावर सुरूच राहतील आणि त्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये तापमान खाली येण्याची शक्यता आहे. तसेच गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे हवामान कोरडे राहील. उत्तरेकडून थंड वारा किमान तापमान एक ते दोन अंशाने खाली आणेल.

शेवटी दक्षिण भारतात, पश्चिम बंगालच्या उपसागरात एक चक्रवाती परिस्थिति आहे. यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणाच्या दक्षिणेकडील भागात उबदार व दमट वारे वाहत आहेत. तर उत्तर तेलंगाणात किमान तापमानात काही अंशांनी घट होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या –

मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता

जाणून घ्या थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे फायदे

डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर

पीक विमा योजनासाठी उपसमिती स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता