Weight Gain Tips | हिवाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Weight Gain Tips | टीम महाराष्ट्र देशा: अनेक लोकांना आपले वजन वाढवायचे (Weight Gain) असते. हिवाळा (Winter) हा ऋतू वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. कारण हिवाळ्यामध्ये योग्य प्रकारे आहार घेतल्याने झपाट्याने वजन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन वाढण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केल्याने वजन वाढल्यास कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. यासाठी तुम्ही घरी तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करू शकतात. यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वजन वाढवण्यासाठी कुठल्याही गोष्टीची अतिरिक्त सेवन करू नये. कारण कुठल्याही पदार्थाचे अतिरिक्त सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हिवाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी तुम्ही पुढील खाद्यपदार्थ खाऊ शकतात.

वजन वाढवण्यासाठी (Weight Gain) आहारात पुढील गोष्टींचा समावेश करा

अंडी

अंडी हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी तुम्ही अंड्याचे सेवन करू शकतात. अंड्याचे नियम सेवन केल्याने तुमचे वजन वाढेल. त्याचबरोबर तुमचे शरीर उबदार आणि निरोगी राहील. अंड्याचे नियमित सेवनाने शरीराला आवश्यक तितके प्रोटीन देखील मिळते. अंड्याचे मदतीने वजन वाढवण्यासाठी तुम्हाला अंड्यातील पिवळा बलकाशशिवाय अंड्याचा पांढरा भाग खावा लागेल. कारण त्याच्या मदतीने वजन वाढू शकते.

पराठे

हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या सहज उपलब्ध होतात. यामध्ये पालक,गोबी, वाटाणे, मेथी इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. तुम्ही या भाज्यांचे सेवन पराठ्याच्या रूपात करू शकतात. नियमित या भाज्यांचे पराठ्याचे सेवन केल्याने हिवाळ्यामध्ये तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.

गाजराचा हलवा

हिवाळ्यामध्ये प्रत्येकालाच गाजराचा हलवा खायला आवडतो. गाजराच्या हलव्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे गाजराचा हलवा खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. गाजराचा हलव्यामध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे तुम्ही माफक प्रमाणातच गाजराच्या हलव्याचे सेवन करावे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या