टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन (Weight) ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. त्यामुळे लोक जिम (Gym) पासून डायटिंग (Dieting) पर्यंत सर्व पर्याय अवलंबतात. पण अनेकांना व्यायाम आणि डायटिंग न करता वजन कमी करायचे असते. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीमुळे अनेकांना डायटिंग आणि व्यायाम करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे ते झटपट वजन कमी करण्याचे मार्ग शोधत असतात. तुम्ही पण जर व्यायाम आणि डायटिंग न करता वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डायटिंग आणि व्यायामाचे वजन कमी कसे करायचे याबद्दल सोप्या टिप्स सांगणार आहोत.
फायबरयुक्त अन्न खा
फायबरयुक्त अन्नाचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले असते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. म्हणून तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. जसे की पालक, बाजरी, संत्री, सफरचंद इत्यादींचा आहारात समावेश करा.
एकाच वेळी जास्त खाऊ नका
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला एकाच वेळी खूप जास्त अन्नाचे सेवन करणे टाळावे लागेल. एकाच वेळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅलरीज वाढतात आणि त्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण व्हायला लागते. त्यामुळे माफक प्रमाणात खाऊन शरीरातील कॅलरीची संख्या कमी करून वजन नियंत्रणात आणता येऊ शकतो.
नियमित नाष्टा करा
आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक नाष्टा वगळतात. पण निरोगी आणि तंदुरुस्त यासाठी नाष्टा खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर नाष्टाचे नियमित वेळेवर सेवन केल्याने लठ्ठपणा देखील कमी होऊ शकतो. यासाठी तुम्ही नाष्टामध्ये पोहे, मूग डाळ, दही, ओटमील इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकता.
गोड खाणे टाळा
तुम्हाला जर डायट आणि व्यायाम न करता वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला गोड पदार्थांना सुट्टी द्यावी लागेल. गोड पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज उपलब्ध असतात त्यामुळे ते खाल्ल्याने झपाट्याने वजन वाढू शकते.
व्यवस्थित झोप घ्या
कमी झोप घेतल्यामुळे लठ्ठपणाचा त्रास वाढायला लागतो. दररोज शरीराला पुरेसे सात ते आठ तास झोप दिली गेली पाहिजे. तुमच्या शरीराला नियमित व्यवस्थित झोप मिळाली तर तुमचा लठ्ठपणा कमी होऊ शकतो.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2023 | आयपीएलमधून संन्यास घेताच, CSK ने सोपवली ब्रावोवर ‘ही’ मोठी जबाबदारी
- Zika Virus | पुण्यात सापडला झिका व्हायरसचा रुग्ण, प्रकृती उत्तम असल्याची मिळाली माहिती
- Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबीन नौटियालने शेअर केली हेल्थ अपडेट, म्हणाला…
- Chennai Super Kings | धोनीनंतर कोण सांभाळणार चेन्नई सुपर किंग्स?, CSK च्या प्रशिक्षकांनी दिली माहिती
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये का करावे अंड्याचे सेवन?, जाणून घ्या