Weight Loss Tips | शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर, करा ‘ही’ योगासनं

Weight Loss Tips | शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर, करा 'ही' योगासनं

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वजन (Weight) वाढणे ही एक अत्यंत सामान्य समस्या आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. त्यामुळे लोक जिम (Gym) पासून डायटिंग (Diet) पर्यंत सर्व पर्याय अवलंबतात. कारण वाढत्या वजनामुळे शुगर, ब्लड प्रेशर आणि हृदयरोग विकार यासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवलेच पाहिजे. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही योगासनांबद्दल माहिती सांगणार आहे. ही योगासने (Yog) नियमित केल्यास शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. त्याचबरोबर नियमित योगामुळे आपले शरीर देखील लवचिक बनते आणि स्नायू मजबूत होतात.

वजन (Weight) नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील योगासने करा

पदसंचालनासन

वजन नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही पदसंचालनासन करू शकतात. हे योगासन करण्यासाठी पाठीवर जमिनीवर झोपा. त्यानंतर शरीराला थोडा आराम देऊन आपले तळवे शरीराच्या बाजूला ठेवा आणि वरच्या दिशेला पाहा. त्यानंतर खांद्यांना सुद्धा थोडा आराम द्या. नंतर श्वास सोडताना उजवा गुडगा वाकून आपल्या मांड्या छातीजवळ आणा. त्याचबरोबर श्वास घेताना सायकल चालवताना जसे पाय फिरवतो त्याप्रमाणे पाय फिरवा. हे तीन फेऱ्या पूर्ण होईपर्यंत करा. तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पाच आणि शेवटी दहा फेऱ्या करा. ही प्रक्रिया दोन्ही पायांसोबत करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की हे असं करताना सायकलमध्ये जसे पॅडेल मारले जाते त्याचप्रमाणे तुमचे पायाचे रोटेशन झाले पाहिजे. या आसनाने पोटाचे स्नायू मजबूत होऊन चरबी निघून जाते. त्याचबरोबर ज्या लोकांना बीपी, हृदय आणि पाठीच्या खालच्या भागाशी संबंधित कोणतीही समस्या आहे, त्यांनी तज्ञांचे मत घेऊनच हे आसन करावे.

पादचक्रासन

पादचक्रासन करण्यासाठी पाठीवर झोपा. त्यानंतर शरीराला आराम देऊन, उजवा पाय वर करा आणि घड्याळाच्या दिशेने तीन फेऱ्या हळूहळू फिरवा. सुरुवातीला या आसनाच्या पाच फेऱ्या करा आणि नंतर त्यांना दहा फेऱ्यांपर्यंत वाढवा. दोन्ही पायांसोबत ही प्रक्रिया अशीच करा. हे असं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पाय नेहमी घड्याळाच्या दिशेनेच फिरवले गेले पाहिजे. हे आसन नियमित करताना तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार याच्या फेऱ्या वाढवा. हे आसन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा गुडघा सरळ आणि तुमचे शरीर जमिनीवर सपाट असावे.

पूर्वोत्तनासन

पूर्वोत्तनासन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पायाच्या सहाय्याने शरीराला वरती उचलावे लागेल. यानंतर हात मागे घेत त्यांना पायांकडे वळवावे लागेल. त्यानंतर पाय वरती करून डोक्यांना मागे नेण्याचा प्रयत्न करा. हे आसन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या शरीर क्षमतेनुसार शरीर वर आणि डोके मागे घेऊन जावे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या