काय आहेत सत्त्वयुक्त नाचणीचे फायदे, घ्या जाणून…..

नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, गोवा व बिहार या राज्यांमध्येही नाचणी पिकविली जाते.

नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीच्या गडद विटकरी रंगामुळेच नाचणी पासून बनविलेल्या पदार्थांना आकर्षक रंग येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा नाचणीचा आहारात समावेश केला जात नाही. नाचणीचा रंग जरी गडद तपकीरी असला तरी चव मात्र उग्र नसते त्यामुळेच गहु, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात त्याप्रमाणे नाचणीचे सुध्दा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात, तसेच पारंपारिक पदार्थांचे पोषण मुल्य वृद्धिंगत करण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो.

हाडांचा अशक्तपणा, हाडं ठिसूळ होणं, हाडं खिळखिळी होणं हे आजार आजकाल दर दहा जणांपैकी एकामध्ये आढळतात. इतके हे आजार सर्वसामान्य होत आहेत. जीवनशैलीचं बदलतं स्वरूप या आजारांचं प्रमुख कारण आहे. हाडांचे आजार असणाऱ्यांना आहारात ‘नाचणी’शिवाय दुसरा पर्याय नाही. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने तंतुमय पदार्थाचं (फायबर) प्रमाण सर्वात जास्त असतं. नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शर्करेचं प्रमाण संतुलित राहतं. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने नाचणीसारखा दुसरा पुरक आहार नाही.

नाचणीचे फायदे –

वजनावरही नियंत्रण ठेवते

शरीरबांधा सडपातळ असावा, असं प्रत्येकालाच वाटतं. ही इच्छा ठेवणा-या प्रत्येकाने तांदळाच्या पदार्थाऐवजी नाचणीपासून बनवलेले पदार्थ खावेत. नाचणीमुळे शरीराला फक्त आणि फक्त ऊर्जाच मिळत नाही तर ‘अमिनो अ‍ॅसिड’ नावाचं आम्ल मिळतं. या आम्लामुळे तसंच त्यात असणा-या तंतुमय पदार्थामुळे आपल्याला लागणा-या भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवली जाते.

लहान मुलांसाठीही गुणकारी

नाचणीचा हलवा, लहान मुलांसाठीचा पोषक आहार समजला जातो. साधारण लहान मुलांना सहा महिन्यांनंतर बाहेरचा आहार दिला जातो. अशा वेळी मुलांना बाहेरचे पदार्थ देण्याऐवजी गूळ आणि गायीच्या तुपापासून बनवलेला नाचणीचा हलवा द्यावा. त्यातून मुलांना योग्य ती पोषणद्रव्यं मिळतातच. शिवाय या आहारामुळे मुलांची पचनशक्ती सुधारते.

नाचणीच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे भाकरीशिवाय शेवया, इडली, डोसा, थालीपीठ, धिरडी, बिस्किटं, चकली, पिझ्झा बेस यांसारखे पदार्थ तयार केले जातात.

शीतल पेय

एक चमचा नाचणीचं पीठ किंवा सत्त्व एक ग्लास गरम पाण्यात मिसळा. त्यात चवीपुरतं मीठ घालावं. गाळून प्यावं. या पेयामुळे शरीराला फक्त थंडावाच मिळत नाही, तर शरीराला शक्तीही मिळते.

शंभर ग्रॅम नाचणीतून मिळणारी पोषणद्रव्यं
कॅल्शियम : ३५० मिलिग्रॅम
लोह : ३.९ मिलिग्रॅम
नायसिन : १.१ मिलिग्रॅम
थायमिन : ०.४२ मिलिग्रॅम
रिबोफ्लेविन : ०.१९ मिलिग्रॅम

महतवाच्या बातम्या –

सतत चिडचिड होत असेल तर याकडे थोडं लक्ष द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त थापा मारता येतात-उद्धव ठाकरे

आता शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू- सुभाष देसाई

‘या’ वेळेला कॉफी पित असाल तर ठरू शकते जीवघेणे(