WhatsApp आपल्या युझर्ससाठी आणणार एक खास फिचर

WhatsApp आपल्या युझर्ससाठी आणणार एक खास फिचर whatsapp disappearing messages android beta

WhatsApp ने आपल्या युझर्ससाठी एक फिचर रोलआऊट केलं आहे. डिसअॅपिअरिंग मेसेज असं या नव्या फिचरचं नाव आहे. परंतु सध्या कंपनीनं याला डिलिट मेसेज असं नाव दिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरबाबत चर्चा सुरू होती. या फिचरच्या साहाय्यानं ठराविक वेळेला मेसेज आपोआप डिलिट करता येणार आहेत.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू !

केवळ बिटा व्हर्जनसाठी हे फिचर उपलब्ध आहे. अँड्रॉईडसोबतच iOS च्या बिटा व्हर्जनवरही हे फिचर देण्यात आलं आहे. कंपनी एका क्लिनिंग टूलप्रमाणे हे फिचर डेव्हलप करत आहे. या फिचरच्या मदतीनं वेळोवेळी ग्रुप चॅट्सही आपोआप डिलिट करून स्टोरेज मॅनेज करता येऊ शकते. हे फिचर व्हॉट्सअॅपमध्ये आल्यानंतर युझर ठरवू शकतो की मेसेज डिलिट होण्यापूर्वी ते किती वेळासाठी चॅटबॉक्समध्ये राहिल.

अवकाळी पावसामुळे संत्र्याचा आंबिया बहर अडचणीत

सध्या केवळ व्हॉट्सअॅप ग्रुप मेसेजेससाठी हे फिचर उपलब्ध होणार आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये वैयक्तीक चॅटसाठीही हे फिचर उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

WhatsApp आपल्या युझर्ससाठी आणणार एक खास फिचर wp