गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणी ८३ टक्क्यापर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये गहू पेरनी नियोजित क्षेत्रापेक्षा निम्म्यावरच आहे. त्यातही गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे. अतीवृष्टीने रब्बी हंगामाच्या पेरणीस विलंब लागल्याचा फटका बऱ्याच पिकांना बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामामध्ये गहू पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. इतर उत्पादनाच्या तुलनेत गव्हाची मागणीही सर्वाधिक असते.

शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल

त्यामुळे बागायतदारां पाठोपाठ कोरडवाहू शेतकरीही गव्हाची पेरणी करतात. परंतू यंदाच्या रब्बी हंगामातील गहू पिकाचे नियोजनच कोलमडले. खरीप हंगाम अंतीम टप्प्यात असताना अतिवृष्टीचा जोर वाढला. त्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले.

अतिपावसाने रब्बी हंगामावर संकट आले. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बहुतांश शेतामध्ये शेती मशागतही होऊ शकली नाही. परिणामी रब्बी हंगाम लांबला. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ५७ हजार ७६० हेक्टर आहे. त्यापैकी ८३ टक्के म्हणजे १ लाख ३० हजार ९४२ हेक्टर पेरणी करण्यात आली आहे.

बिनपाण्याची शेती… महिन्याला दीड लाखांचं उत्पन्न