भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा आणि कोणी सादर केला?

अर्थसंकल्प

(दि. ३१ जानेवारी) पासून  संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांच्या अध्यक्षतेखाली भारताचा अर्थसंकल्प (Budget) सादर  झाला आहे. पण भारतीय संसद जेवढी जुनी आहे, तेवढाच भारताच्या अर्थव्यवस्थेचा इतिहासही जुना आहे. ब्रिटिश काळापासून भारतीय अर्थसंकल्प (Indian Finance Budget) सादर केला जात होता. ब्रिटिश भारत सोडून गेले पण भारताचा अर्थसंकल्प सुरू त्यांनीच केला होता. भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी आणि केव्हा सादर केला हे जाणून घेऊया.

जेम्स विल्सन (James Wilson) या स्कॉटिश व्यवसायिकाने भारताचा पहिला अर्थसंकल्प १८५९ मध्ये संसदेत सादर केला. ह्या अर्थसंकल्पाला मात्र भारतात कडाडून विरोध केला गेला. भारताच्या त्या वेळच्या परिस्थितीची विल्सन साहेबांनी आपल्या संकल्पात दखल घेतली नसल्याची त्यावेळी चर्चा झाली आणि हा अर्थसंकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला. परंतु पुढे जेम्स विल्सन यांनी भारतीय अर्थसंस्थांना कामकाजाची पद्धत घालून दिली. आयकर विभागाचे (Income Tax) काम त्यात प्रामुख्याने येते.

ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलेल्या १८५७ च्या उठवातून ब्रिटिश नुकतेच सावरत होते. त्याच कालावधीत विल्सन यांना भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी राणीने भारतात पाचारण केले होते. जेम्स विल्सन हे त्या काळच्या अर्थकारण वृत्तपत्रांचे (Finance Newspaper) आद्य संस्थापक होते. कार्ल मार्क्स (Karl Marx)  यांनी आपल्या ‘कॅपिटल’ (Capital) या पुस्तकात त्यांचा उल्लेख एक उच्च दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ (Economist)  असा केला आहे.

महत्वाच्या बातम्या –