जेव्हां शरद पवार एकेकाळी कट्टर विरोधक असणारे राजू शेट्टींचे कौतुक करतात

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काहीदिवसांपूर्वी पाऊण तास चर्चा झाली होती. तेव्हापासून खासदार राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलेच घनिष्ट सबंध निर्माण होत आहेत. राजू शेट्टींवर शरद पवारांनी स्तुतिसुमने उधळल्यामुळे हे स्पष्ट झाले आहे. सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

  साखर निर्यातीवरील शुल्क काढने. तसेच आयात साखरेवरील शुल्क शंभर टक्के केले. श्री. शेट्टी यांच्यासह आमच्या लोकांची हीच मागणी होती. त्यातून काही तरी बदल होत आहेत; पण ते पुरेसे नाहीत. त्यात अजूनही बदल झाले पाहिजेत; पण केंद्र सरकार वेगळेच निर्णय घेत आहे. मध्यंतरी सरकारने देशातील ज्या महत्त्वाच्या बॅंका आहेत, त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी ८० हजार कोटी भरले. त्यानंतर पुन्हा १ लाख २० हजार कोटी भरले. आर्थिक परिस्थिती असलेल्यांकडून कर्ज बुडवली गेली. त्यांची भरपाई शासनाने केली, हे चुकीचे आहे.’‘ जिल्ह्यात उसाचा प्रश्न आहे, त्यावरच आजपर्यंतचे राजू शेट्टींचे समाजकारण, राजकारणावर अवलंबून आहे. त्यातून त्यांनी आमच्यावरही प्रेम केलं. पण सत्तेतील लोकांची धोरणे चुकली तर त्यावर हल्ला हा करावाच लागतो, त्याशिवाय बदल होत नाही, हे काम श्री. शेट्टी यांनी केले,

पवार आणि शेट्टी हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. मात्र गेल्या काही दिवसात राजकीय परस्थिती बदलल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद निर्माण झाला आहे. राजु शेट्टी यांच्या पुढाकाराने मुंबईत घेतलेल्या संविधान रॅलीमध्ये पवार सहभागी झाले होते. त्यानंतर दिल्लीत शेट्टी यांनी पवार यांची स्वतंत्र भेट घेतली होती. भाजप विरोधातील रणनितीबाबत आणि राज्यातील राजकारणाताबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  तसेच शरद पवारांनी शेट्टींचे कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे.