कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी कधी लसीकरण करून घ्यावे? माहित करून घ्या

कोरोना

दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक लावण्यात आला आहे. दरम्यान, लसीकरण करून घेण्याआधी नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न असतात ! यातीलच एक प्रश्न म्हणजे कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी साधारणतः कधी लसीकरण करावं ?

आता याबाबत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘देशासह विदेशातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाची लागण होऊन गेलेल्या नागरिकांमध्ये साधारणतः ६ महिने अँटीबॉडीज असतात. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांनी ६ महिन्यानंतर म्हणजेच कोरोनातून बरं झाल्यानंतरच्या ६ महिन्यांनी लस घ्यावी. ६ महिन्यापर्यंत अँटीबॉडीज कोरोनापासून रक्षण करतात, असं वैज्ञानिक संशोधनातून समोर आलं आहे.’ असं डॉ. पॉल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –