लहान मुलांना कोरोनाची लस कधी मिळणार? जाणून घ्या

लहान मुलांना कोरोनाची लस कधी मिळणार? जाणून घ्या Vaccine 3

नवी दिल्ली – कोरोना महामारीने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने यावेळी खबरदारी म्हणून तिसऱ्या लाटेआधीच तयारी सुरु केली आहे. दरम्यान आता तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारतात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोनाची लस देण्याची योजना सरकार आखत आहे.देशात 12 ते 17 वयोगटातील सुमारे 12 कोटी मुलं आहेत, पण सर्वात आधी गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना कोरोना लिस दिली जाणार आहे. DCGI कडून 12 वर्षे आणि त्यावरील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी मिळाली असून, Zydus Cadila ची लस Zycov-D या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना देण्याची योजना आहे.

महत्वाच्या बातम्या –