राज्यात पावसाचं पुनरागमन कधी होणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

अवकाळी

मुंबई – मागच्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. तर राज्यातील अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तर आता यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. दर, आता अर्धा पावसाळा उलटल्यानंतरही मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची देखील प्रतीक्षा आहे.

तर राज्यातील काही ठिकाणी अतिपाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ अशी विषम स्थिती निर्माण झाली असून दोन्ही भागातील शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तर राज्यात ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर हा कमी झाला आहे. तर यातच आता एक चांगली बातमी येत आहे की आता पुढील ४ ते ५ दिवसात पुन्हा मान्सून अधिक सक्रिय होऊन हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अन्दाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

तर राज्यात पुढच्या 4-5 दिवसांमध्ये पावसाची पुनरागमन होण्याच अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलीय. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केलाय. पावसाचा जोर हा अधिक राहणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी शेतकऱ्यांना पीक पिकवण्यासाठी गरजेचा असा हा पाऊस असल्याने आता काहीशी आशा शेतकरी वर्गामध्ये पुन्हा निर्माण होत आहे.

महत्वाच्या बातम्या –