‘या’ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला राज्यातील नेते कधी येणार ?

शेतकरी अडचणीत

नगर – पावसाने लाखो शेतकऱ्याना उद्वस्त केलं आहे. आधी दुष्काळाने मारले, यंदा ओल्या दुष्काळाने मारलेय. मात्र असे असताना पंचनामे होत नाहीत. नगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का? येथील शेतकऱ्यांचे आश्रु सरकारमधील लोक, पालकमंत्री कधी पुसणार असा प्रश्न शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी उपस्थित केला.

सर्व शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपातील बाजरी सोयाबीन तूर भुईमूग यासह फळपिके आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात शेवगाव, पाथर्डी, कर्जत सह सह जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अति जोरदार पावसामुळे पिकांचे सन झाले असून शेतकरी अक्षरश: उद्धवस्त झाले आहेत.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अनेक भागात अतिवृष्टी म्हणजेच 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नसल्याचे सांगत पंचनामे केले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. राज्यातील विविध भागांमध्ये राजकीय नेते पदाधिकारी पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. असे असताना नगर जिल्ह्यात मात्र राजकीय नेत्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

पालकमंत्री अजूनही कोणत्याही शेतकऱ्यांच्या दारात नाहीत. पावसाने लाखो शेतकऱ्याना उद्वस्त केलेय. आधी दुष्काळाने मारले. यंदा ओल्या दुष्काळाने मारलेय. असे असताना पंचनामे होत नाहीत. नगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का? येथील शेतकऱ्यांचे आश्रु सरकारमधील लोक, पालकमंत्री कधी पुसणार? सर्व शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकरी मराठा महासंघातर्फे आंदोलन करण्यात येईल. जिल्हा प्रशासन तसेच शासनाने तातडीने झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी संभाजी दहातोंडे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –