कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती

मास्क

पंढरपूर – राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच ओमायक्रॉनचे (Omicron) देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार? याविषयीही माहिती दिली.

यावेळी कोरोनाच्या नवीन न्यूकॉन व्हेरिंयटविषयी बोलत असतांना राजेश टोपे म्हणाले की,‘हा व्हेरियंट धोकायदायक आणि घातक असल्याचे म्हटले जात आहे. परंतु राज्यातील आरोग्य यंत्रणा या विषाणुचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे’, असे टोपे म्हणाले. तसेच कोरोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल, अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope)  यांनी दिली.दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘इतर देशांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आलेली आहे, तसेच निर्बंध देखील कमी करण्यात आले आहेत. परंतु भारतामध्ये कोरोनासोबत जगण्यासाठी नवी नियमावली बनवायला हव’, असे टोपे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –