उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार? जाणून घ्या

हवामान विभाग

मुंबई – हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार उद्या 22 जानेवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Untimely rain) पडणार आहे.  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  २२ आणि २३ जानेवारीला पावसाची (rain) शक्यता  हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (rain) पडला.  तर राज्यात काही ठिकाणी गरपती झाल्या. तर या पावसामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा गारपीटची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी (rainfall) पोषक हवामानाची तयार झालं आहे. 22 आणि 23 जानेवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात 22 आणि 23 जानेवारी रोजी कोकणासह मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

आज (२२ जानेवारी) – मुंबई,  पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात अवकाळी पावसाची (Untimely rain) शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तवली आहे.

उद्या (२३ जानेवारी) –  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –