उद्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार? जाणून घ्या

मुसळधार पाऊस

दिल्ली – देशातील काही रराज्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये  मागील काही दिवसांपासून थंडी कमी झाली आहे.  थंडी कमी झाल्यामुळे तेथील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळत आहे. तर हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार झारखंड आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या लगतच्या राज्यांसह पश्चिम उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या बंगालमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडू शकतो अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे . तर हवामान विभागाने पाऊस थांबल्यानंतर राज्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या –