‘या’ जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांना मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ

कोरोना

औरंगाबाद – कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. आज (दि. ३०) घाटी रूग्णालयामध्ये दिवसभरात २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

सध्या घाटीत उपचार सुरू असलेल्या ६२९ रुग्णांपैकी ४१३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर १२९ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे. घाटीत अतिगंभीर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, जुने आजार असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. गेल्या चोवीस तासात २७ जणांचा घाटीत मृत्यू झाला आहे. यातील बहुसंख्य वयोवृध्द रुग्ण आहेत.

या मृतांमध्ये गंगापूर मधील ४९ वर्षीय व्यक्तीचा, गारखेडा परिसरातील ८० वर्षीय वृद्धाचा, पैठण मधील ६० वर्षीय वृद्धाचा, भोकरदन येथील ५६ वर्षीय पुरुषाचा, सिडको येथील ६५ वर्षीय वृद्धाचा, कटकट गेट येथील ६५ वर्षीय वृद्धाचा, सिडकोतील ५८ वर्षीय वृद्धाचा, कन्नड येथील २९ वर्षीय पुरुषाचा, यासीन नगर येथील ३९ वर्षीय पुरुषाचा, वैजापूर येथील ९२ वर्षीय स्त्रीचा, वैजापूर येथील ८० वर्षीय स्त्रीचा, मुकुंदवाडी येथील ७० वर्षीय पुरुषाचा, कन्नड ७० वर्षीय स्त्री, औरंगाबाद ८१ वर्षीय वृद्ध,देवळाइ येथील ६६ वर्षीय पुरुष,वैजापूर येथील ६२ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुष, सिडको येथील ७८ वर्षीय , जुबली पार्क येथिल १४ वर्षीय मुलाचा, भोकरदन येथील ५० वर्षीय पुरुषाचा, सातारा येथील ७९ स्त्रीचा, पैठण येथील ५८ वर्षीय पुरुषाचा, मुकुंदवाडी ७० वर्षीय स्त्री, खुलताबाद येथील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –