राहुरीतील बेकायदेशीर वखार कोणाच्या आशीर्वादाने ?

राहुरी / राजेंद्र साळवे : राहुरी तालुक्यातील वनविभागाने गरीब साधारण नागरीकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम सुरू केले आहे ,वनविभागाचे मुख्य वन अधिकारी स्वतःचे प्रशासकीय कामात किती तरबेज आहेत हे आता समोर आले आहे. शहरातील बोगस वखारी वर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा तक्रार अर्ज राजु अन्तोन साळवे यांनी वनविभागाकडे दीला आहे व तशी पोहचसुध्दा त्यांना देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
राहुरी शहरातील मागील काही वर्षापासून मध्यवर्ती खंडोबा मळा या भागात चोरट्या पध्दतीने सर्वच प्रकारचे झाडे तोड़ुन त्याची विक्री करण्यासाठी वखार चालु केली आहे. ही वखार गणेश भाटीया , रॉकी भाटीया,महेन्द्र भाटीया यांनी सुरू केली. या वखारी बद्दल राहुरी वनविभागास संपूर्ण इत्यंभुत माहीती आहे. आता पर्यंत या शासकीय वनविभागास ही वखार बेकायदेशीर सुरू आहे की नाही हेच माहीती नाही असे राहुरी चे वनअधिकारी यांनी साळवे यांना तक्रार अर्ज घेते वेळी सांगीतले. ही वखार चालविणारे वनविभागाच्या अधिकारी यांना हाताशी धरून आपला व्यवसाय बिनबोभाट चालवत आहे. राजू साळवे यांनी तक्रार अर्ज दिल्यावर वखार चालकावर गुन्हा दाखल करावा व ही बेकायदेशीर लाकूड विक्री व खरेदीची पध्दत त्वरीत बद करावी अशी मागणी साळवे यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे . गुन्हा तर लांबच पण साधा पंचनामा सुध्दा योग्य पध्दतीने केला नाही असे साळवे यांनी सांगीतले . वखार चालकांवर ज्या शासकीय पध्दतीने कडक कारवाई व्हायला पाहीजे ती झालेली नाही . भाटीया बंधुना साधी झाडाची धलपी सुध्दा विक्री करण्याची परवानगी नसताना एवढी लाखो रूपयांची वखार सुरू झालीच कशी ? वनविभागाच्या अधिका-यामुळे अवैध वखारीस अभय मिळत आहे का ? यात धक्कादायक बाब म्हणजे आता राहुरी वन विभागाने अस लेखी दिले आहे की “भाटीया यांना वखार चालवण्याचा परवाना आमच्याकडून दिलेलाच नाही.” मग परवाना नसताना ही वखार नक्की चालते कोणाच्या आशीर्वादाने ? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे .


राज्य शासनाचा उद्देश आहे की ” झाड़े लावा झाड़े जगवा ” असा असताना हा व्यक्ती या शासनाच्या निर्णयास खुलेआम हरताळ फासत आहेत. बिल्डींग बांधकामास उपयुक्त असणारे चौकटी , दरवाजे , तयार करून चढ्या भावाने विक्री करून अवैध संपत्ती कमावत आहे. या व्यक्तीची भुतकाळातील आर्थिक चौकशी करून वनविभागाचे जे अधिकारी या वखारचालकास मदत करत असतील त्यांना त्वरीत आपल्या पदावरून सेवामुक्त करावे अन्यथा जनसमुदायामार्फत मोठे जनअंदोलन पुकारले जाईल असा संतापजनक इशारा राजु अन्तोन साळवे यांनी दीला आहे.