सत्तेत असताना आघाडी सरकारने स्वामिनाथन आयोग का लागू केला नाही?- रघुनाथदादा

टीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे शेतकरी प्रेम म्हणजे फक्त ड्रामेबाजी असल्याची घणाघाती टीका सुकाणू समितीचे सदस्य आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.रघुनाथ दादा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कॉंग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली. सत्तेत असताना आघाडी सरकारने स्वामिनाथन आयोग का लागू केला नाही? असा थेट सवाल पाटील यांनी उपस्थित केला.फडणवीस सरकारच्या आतापर्यंतच्या कामावर नाराजी दर्शवत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार उदासीन असल्याचीही त्यांनी टीका केली .

पहा सुकाणू समितीची संपूर्ण पत्रकार परिषद