राज्यात निर्बंध लावावे की लावू नये यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार?

नवी दिल्ली : यूरोप आफ्रिकेसह जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा पहिला फोटो समोर आला आहे. इटलीतल्या विद्यापीठाने तो प्रसिद्ध केला आहे. जगातील अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याने अनेक देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. ओमायक्रॉनसंदर्भात (Omycron)अजून तरी आपल्या राज्याला भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे अजून दिसले नाही.  पण या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनवर चर्चा करण्यात आली आहे.

या वेळी राज्यात निर्बंध लावावे की लावू नये? नवी नियमावली काय असेल? यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी असेही ठरले आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी काय नियमावली असावी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच पंतप्रधानांशी बोलणार असल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक पार पडली. तब्बल तासभर ही बैठक सुरु होती. नव्या व्हेरियंटबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावेळी सर्वच मंत्र्यानी नव्या नियमावली संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करण्याचे सुचवले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे मान्य करुन लवकरच मोदींशी या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, 13 देशात येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत दुबईने जी नियमावली केली आहे. अशाच प्रकारची नियमावली महाराष्ट्रातही नियमावली असावी याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. ही नियमावली तपासून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या –