१ जून नंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का? याबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

राजेश टोपे

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुगांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा प्रभाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र अजूनही कोरोनाचा धोका काही कमी झाला नाही, त्यामुळे हे निर्बंध अजून वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

१ जून नंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार का यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील,’ अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.

‘सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निर्बंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्यानं मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील,’ अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

महत्वाच्या बातम्या –