पुणे – काल शिवजयंती निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) शिवनेरीत होते त्यावेळी अनेक कार्यक्रम पार पडले. शिवनेरी येथे शिवजयंती सोहळ्यात अजित पवार यांचे भाषण सुरु असताना तरुण मुलांनी अजित पवार याना मराठा आरक्षणाचे(Maratha reservation) काय झाले, मराठा आरक्षण कधी देणार असा सवाल उपस्थित केला ? त्यावेळी भाषणात व्यत्यय आला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि ‘बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आणि आम्ही सुद्धा मराठ्यांच्या पोटचे आहोत आम्हाला हि मराठा आरक्षण मिळवून द्यायचे आहे आम्हाला आरक्षण विषय खेळवत ठेवायला आनंद वाटत नाही. काही कायद्याचे अडचणी आहेत त्यांना आम्ही सामोरे जात आहोत त्यातून पुढे मार्ग निघेल असे अजित पवार म्हणाले.
मराठा आरक्षण चर्चा -(Maratha Reservation Discussion -)
कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला(Maratha reservation) धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत तसा आम्ही नियम केला आणि २८८ आमदारांनी तसा ठराव केला आहे. काही गोष्टी कायदा आणि न्यायालय प्रलंबित आहेत.तसेच बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) आणि मी पंतप्रधानांना भेटलो होतो. आम्ही पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे १२ मागण्या केल्या असून पहिली मुख्य मागणी मराठा आरक्षणाची असेल तसेच पंतप्रधानांनी चर्चा करण्याच अश्वासन दिले आहे,
मराठ्यांना फाशीवर चढवणार का ?(Will Marathas be hanged?)
अजित दादा म्हणाले कि हि भाषा नाही… तुम्ही काय कोणाची सुपारी घेऊन आल्यात का ? हि पद्धत नाही बोलायची आज शिवजयंती आहे तुमचं आधी मी ऐकून घेतलं होते.
तसेच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण माहिती देताना म्हणाले कि केंद्र सरकारने कायद्यात बदल केला असून ५० टक्याहून अधिक आरक्षण देण्याची तरदूत केली आहे त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळू शकेल असे हि ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा – छगन भुजबळ
- कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे
- शेतकरी कर्जमुक्ती, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा व अन्य विविध विका
- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत –
- मोठा निर्णय – दुकानदारांना मिळणार आता निवृत्ती वेतन !