कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार? याबाबत अमित शाह यांचं स्पष्टीकरण

अमित शाह

नवी दिल्ली – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. अख्ख्या जगातील संशोधक, तज्ज्ञ मंडळी कोरोनावर संशोधन करत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाची ही भयावह परिस्थिती पाहता संपूर्ण देशातच पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात येईल, अशी शक्यता वाटत आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, सध्यातरी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावला जावा, अशी परिस्थिती दिसत नाहीये. देशामध्ये गडबडीमध्ये लॉकडाऊन लावला जाऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याचा भारतातील वेग हा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. यातच हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू आहे. त्यामुळे इथे होणाऱ्या गर्दीने कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाणही मोठे आहे. अनेक साधू-संत कोरोना बाधित झाले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे डेहराडून येथे निधन झाले. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना संकटाचा विचार करता कुंभ मेळा केवळ प्रतिकात्मक ठेवावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –