पुणे – राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं होतं. मात्र, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जूननंतर सरसकट लॉकडाऊन उठणार नाही, असं भाष्य केलं होतं. दरम्यान, राजेश टोपे हे आज पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढणार, असं सूतोवाच केलं आहे.
तर, दुसरीकडे जलसंपदामंत्री यांनी देखील राज्यातील लॉकडाऊन बाबत भाष्य केले आहे. राज्यात सुरू असलेला लॉकडाउन वाढवायचा का हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील परिस्थिती पाहून घेतील, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. करोनाचा पॉझिटिव्हीटीचा दर जरी खाली घसरला असला तरी देखील तो पूर्णपणे कमी झालेला नाही. यांमुळे करोनाचे संकट पूर्णपणे टळले असे म्हणता येत नसल्याचेही पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढच्या ४८ तासांत वादळी पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- कोरोना संकटकाळात बचतगटांतील महिलांनी केली ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल – हसन मुश्रीफ
- खरीप हंगामासाठी पीक कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा – यशोमती ठाकूर
- उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज