रत्नागिरी – राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून कोरोना मुक्तांचा आकडा हा अधिक आहे. मात्र, अद्यापही राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या हि चार लाखांपार असून दररोज रुग्णांमध्ये होणारी वाढ ही देखील आटोक्याबाहेर आहे. अशातच, तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला असून लहान वयोगटातील मुला-मुलींना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं असून पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकणच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी त्यांनी १ जूननंतरही लॉकडाऊन वाढणार का ? या प्रश्नावर देखील भाष्य केलं आहे. ‘कोरोना कमी होतोय हे नक्कीच, पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतलाय. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण, थोडीशी शिथिलता आली अन् कोविड चौपटीने वाढला,’ असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये पूर्णपणे शिथिलता दिली जाणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी – राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट
- ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०
- जिल्ह्यासाठी चांगली बातमी: गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत
- तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांस मुख्यमंत्री आज भेट देणार