खरंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असेल का? याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती

कोरोना

दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, अनेक तज्ञ मंडळींकडून आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्य सरकारांनी खबरदारीचं पाऊल म्हणून लहान बालकांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था देखील सुरु केली आहे. मात्र आता तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग मुलांना होईल असं वाटत नाही, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

देशातील कोरोनाच्या स्थितीबाबतच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रभावित झाले नाहीत. त्यामुळेचे तिसऱ्या लाटेतही लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल असं वाटत नाही किंवा तसे कोणते संकेत वा पुरावेही मिळालेले नाहीत. मुलांना कोरोना झाला तरी लक्षणे सौम्य आहेत. कोरोना व्हायरस तोच आहे, त्यामुळे असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत की मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे.’ यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी काळजी घेणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या –