बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय होणार? केंद्र सरकारची आज महत्वाची बैठक

परीक्षा

दिल्ली – देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना रोगाने माजवलेल्या हाहाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रला देखील मोठा फटका बसला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महिन्याभरापूर्वीच सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश निशंक पोखरीयाल यांनी जाहीर केले. यासोबतच, बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या असून त्यांची तारीख नंतर जाहीर केली जाईल असे कळवण्यात आले होते. गेल्या काही आठवड्यांमध्ये बारावीच्या परीक्षा देखील रद्द केल्या जाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर रमेश पोखरियाल निशंक यांनी 23 मे रोजी भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून या बैठकीत विषयी माहिती दिली आहे. या बैठकीचे अध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे असेल. या बैठकीला महिला आणि बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हेदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –