लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी असेल का ? यावर आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

राजेश टोपे

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

याच पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली होती. यामध्ये महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर नियमावली येत्या काही तासांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कडक लॉकडाऊनच्या भीतीमुळे राज्यातील विविध भागातून शहरात आलेल्या नागरिकांसह परराज्यांतील नागरिकांनी देखील गावाची वाट धरल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी असेल का ? सार्वजनिक वाहतूक सुरु असेल का ? यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘या लॉकडाऊनमध्ये रेल्वे, बस बंद राहणार नाही. जिल्हाबंदी नसेल, मात्र नियम कडक केले जातील. कुणालाही विनाकारण या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. ठोस कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांची चौकशी केली जाईल,’ असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –