Winter Care Tips | सावधान! हिवाळ्यामध्ये स्वेटर घालून झोपत असाल तर होऊ शकतात ‘या’ आरोग्याच्या समस्या

Winter Care Tips | सावधान! हिवाळ्यामध्ये स्वेटर घालून झोपत असाल तर होऊ शकतात 'या' आरोग्याच्या समस्या

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) येताच अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात थंडीच्या वातावरणामध्ये आपण अंगावर दोन ते तीन थर कपडे घालत असतो. त्याचबरोबर शरीराला उब मिळण्यासाठी आपण स्वेटर (Sweter) परिधान करत असतो. कधी कधी इतकी थंडी असते की आपण झोपतानाही (Sleep) स्वेटर घालून झोपतो. अशावेळी तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्या मंडळी कडून ऐकले असेल की स्वेटर घालून झोपणे ही चांगली बाब नाही. होय! तर हे अगदी खर आहे स्वेटर घालून झोपू नये. कारण त्याचे आपल्या आरोग्याला नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. रात्री स्वेटर घालून झोपले नाही तुमच्या आरोग्याला पुढील परिणाम भोगावे लागू शकतात.

स्वेटर घालून झोपले नाहीत थंडी सहन करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो

जाड आणि लोकरीचे कपडे म्हणजेच स्वेटर घालून झोपल्याने शरीराची थंडी सहन करण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत तुम्ही जर कमी उबदार कपडे घालून बाहेर पडला, तर तुम्हाला थंडी सहन होऊ शकणार नाही. त्याचबरोबर वातावरण थोडे जरी थंड झाले, तरी तुम्हाला भरपूर थंडी जाणवू शकते.

स्वेटर परिधान करून झोपल्याने गुदमरण्याची समस्या होऊ शकते

जाड आणि उबदार कपडे ऑक्सिजनमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे गुदमरणे आणि अस्वस्थता यासारख्या समस्या होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला जर श्वसन संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही उबदार आणि जाड कपडे घालून झोपू नये.

जाड आणि उबदार कपडे घालून झोपल्याने झोपेची समस्या निर्माण होते

चांगली झोप लागण्यासाठी आरामदायी कपडे असणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही जाड आणि लोकरीचे कपडे घालून झोपला, तर तुम्हाला रात्रभर नीट झोप लागत नाही. परिणामी तुमचा पुढचा दिवस आळस देण्यामध्ये व्यर्थ जाईल.

त्वचेशी संबंधित समस्या

अनेकदा थंडीचे कपडे बनवण्यासाठी कृत्रिम प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे हे कपडे परिधान केल्याने त्वचेमध्ये एलर्जीची समस्या निर्माण होऊ शकतो. अशात तुम्हाला त्वचेवर खाज देखील येऊ शकते. हिवाळ्यामध्ये त्वचेच्या कोरडेपणामुळे खाज येणे सामान्य गोष्ट आहे. परंतु, स्वेटर घालून झोपल्याने ही समस्या वाढू शकते.

टीप: वरील माहितीबद्दल  संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या