टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत गुलाबी थंडी आणि संसर्गजन्य रोग (Viral Infaction) सोबत घेऊन येतो. हिवाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन ही जवळजवळ प्रत्येकाची समस्या बनते. त्यामुळे थंडीमध्ये सतर्क राहण्याची प्रत्येकाला गरज असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये सर्दी टाळण्यासाठी हिवाळी कपडे परिधान करतात. पण त्यानंतरही अनेक लोक सर्दी सारख्या आजारांना बळी पडतात. कारण हिवाळ्यामध्ये शरीराला आतून उबदार ठेवणे खूप गरजेचे असते. या थंडीमध्ये शरीर आतून उबदार असल्यास सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्येपासून आपण दूर राहू शकतो. आपल्या आहारामध्ये काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास शरीर आतून उबदार राहू शकते. परिणामी तुम्ही या हिवाळ्यामध्ये तंदुरुस्त राहू शकतात. म्हणूनच हिवाळ्यामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केल्यामुळे शरीराला आतून उब मिळू शकते याबद्दल आम्ही या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे.
गुळ
आपल्या आहारामध्ये गुळाचा समावेश करणे हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरू शकतो. गुळामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, आयरन आणि पोटॅशियम उपलब्ध असते. त्यामुळे या थंडीमध्ये गुळाचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ उबदार राहू शकते. त्याचबरोबर गुळ खाल्ल्याने सर्दीचा त्रास देखील कमी होऊ शकतो. सर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही गुळाच्या चहाचे सेवन करू शकतात.
खजूर
खजूर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आयरन, प्रोटीन, जिंक, कार्बोहाइड्रेट, विटामिन के इत्यादी आरोग्यदायी घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये खजुराचे सेवन केल्याने शरीर आतून उबदार राहते. त्याचबरोबर खजूर खाऊन तुम्ही ऋतुजन्य आजारांपासून दूर राहू शकतात. नियमित खजूर खाल्ल्याने शरीरात मधील अशक्तपणा दूर होऊन तुम्हाला अतिरिक्त ऊर्जा ही मिळू शकते.
लसूण
लसणाला पोषक तत्वांचे भांडार असे देखील म्हटले जाते. कारण लसणाच्या सेवनाने मोसमी आजारच बरे होततच आणि त्याचबरोबर पोटही निरोगी राहते. लसणाच्या नियमित सेवनाने व्हायरल इन्फेक्शन पासून आपण लांब राहू येऊ शकते. कारण लसणामध्ये फायबर, प्रोटीन आणि विटामिन सी उपलब्ध असते. त्यामुळे या गुलाबी थंडीत लसणाचे नियमित सेवन केल्याने आपले शरीरातून उबदार राहू शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Dry Skin Tips | हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपेपूर्वी लावा ‘या’ खास गोष्टी
- Sushma Andhare | “ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला?”; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला
- Devendra Fadnavis | “उद्धव ठाकरेंनी मनाचीच नाही तर जनाची पण लाज बाळगावी” ; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
- Urfi Javed | चेतन भगतच्या विधानावर उर्फीने दिले चोख उत्तर, म्हणाली…
- Raj Thackeray | “अरे गधड्या तुझी लायकी…”; राज ठाकरेंची राहुल गांधींवर सडकून टीका