टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) कडाक्याच्या थंडी (Cold) मुळे शरीरामधील लवचिकता कमी होऊन शरीर जड होते. शरीर जड झाल्याने आपल्याला काहीच करावेसे वाटत नाही फक्त झोपावे असे वाटते. पण दैनंदिन कामामुळे हे शक्य होत नाही. त्यामुळे शरीरातील लवचिकता परत आणण्यासाठी आरोग्यदायी दिनचर्या खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर व्यवस्थित दिनचर्या असल्यास आळसही दूर होतो आणि आरोग्य ही सुदृढ राहते. त्याचबरोबर थंडीमध्ये काही योगासने (Yoga) आणि व्यायाम (Exercise) केल्याने शरीरातील लवचिकता व्यवस्थित राहू शकते. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही योगासनांबद्दल माहिती सांगणार आहोत. जी केल्याने तुमचे शरीर लवचिक राहू शकते.
पदहस्तासन
पदहस्तासन नियमितपणे केल्याने तुमचे हृदय मजबूत राहू शकते. त्याचबरोबर हे आसन केल्याने पोटावरची चरबी देखील कमी होते. पाचन समस्या दूर करण्यासाठी आणि उंची वाढवण्यासाठी देखील हे योगासन उपयुक्त आहे. हे योगासन करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पाय जोडून उभे राहावे लागेल. त्यानंतर हळूवारपणे हात डोक्याच्या मागे नाहीत हळूहळू पुढे पायापर्यंत आणावे लागेल. खाली वाकल्यानंतर तुमचे डोके गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. हे योगासन नियमित केल्याने तुमच्या शरीराला लवचिकता प्राप्त होऊ शकते.
अधोमुख स्वानासन
अधोमुख स्वानासन नियमितपणे केल्याने तुमच्या शरीरातील खालचा भाग आणि स्नायू मजबूत आणि सुदृढ होतात. नियमित हे आसन केल्याने स्थायूंवर ताण पडून रक्ताभिसरण देखील सुधारू शकतो. त्याचबरोबर हे आसन केल्याने यकृत आणि किडनीचे आजार देखील नाहीसे होतात. हे आसन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पोटावर झोपावे लागेल. त्यानंतर तळहाताच्या आणि पायाच्या मदतीने हळूहळू शरीराला वरती उचलावे लागेल. हे आसन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपल्या शरीरिक क्षमतेनुसार शरीर वरती उचलले गेले पाहिजे.
चक्रासन
चक्रासन हे आसन नियमित केल्याने तुमचे शरीर लवचिक होते आणि त्याचबरोबर वजनही नियंत्रणात राहते. हे आसन केल्याने टाईप 2 डायबिटीसच्या रुग्णांना खूप फायदा होऊ शकतो. हे आसन नियमितपणे केल्यावर पाठीचा कणा देखील सरळ राहतो. चक्रासन करण्यासाठी तुम्हाला पाठीवर झोपावे लागेल. त्यानंतर पायाच्या आणि हाताच्या मदतीने शरीर वर उचलावे लागेल. त्याचबरोबर तुम्ही हे आसन उभे राहून देखील करू शकता. उभे राहून चक्रासन करण्यासाठी तुम्हाला तुमचे शरीर हाताच्या मदतीने हळूहळू जमिनीपर्यंत न्यावे लागेल. तळपाय आणि तळहात जमिनीवर एका रेषेमध्ये आल्यानंतर तुमचे चक्रासन पूर्ण होईल.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | “40 आमदारांचा हट्ट पुरवण्यात सरकार व्यस्त”; रोहित पवार यांचा हल्लाबोल
- Vikram Gokhale | दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर, 15 दिवसांपासून रुग्णालयात दाखल
- Chandrakant Khaire | “हवन करून तुमची सत्ता उलथवून टाकतो”; चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य
- Bhavana Gawali | “खरे गद्दार तर तुम्ही” ; भावना गवळींचा आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला
- Lips Care Tips | ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय