मुंबईसह राज्याला हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने राज्यातून घेतली माघार

मुंबईसह राज्याला हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने रविवारी म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी राज्यातून माघार घेतली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने तशी घोषणा केली आहे. पुढील चार दिवस राज्यांत कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आज म्हणजेच १० फेब्रुवारी २०२० आणि ११ फेब्रुवारी २०२० रोजी समुद्रकिनारी ३० ते ३२ तर राज्यभरात कमाल तापमान २८ ते ३० अंश नोंदविण्यात येईल.

थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार

तर १२ फेब्रुवारी रोजी समुद्रकिनारी कमाल तापमान ३० ते ३२ अंश, तर कोकणात कमाल तापमान ३२ ते ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलेनत उल्लेखनीय वाढ झाली आहे.

दवबिंदू गोठले, थंडीचा कहर, द्राक्षासह पिकांचे मोठे नुकसान

चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, सांगली आणि सोलापूर येथे येत्या २४ तासांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत उबदार दिवस व सुखद रात्रीसह हवामान कोरडे राहील. तर मराठवाडा आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात पुढील २४ तासांत हलक्या सरी आणि गडगडाटी परिस्थिती निर्माण होईल. विदर्भातील दक्षिणेकडील भागातही पुढील २४ तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.