टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) सुरू होताच त्वचा (Skin) च्या अनेक समस्या सुरू व्हायला लागतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये त्वचेवरील कोरडेपणाची (Dry Skin) समस्या जास्त वाटते. त्याच्यावर कोरडेपणा निर्माण झाल्यावर त्वचेवर काळवटपणा देखील निर्माण व्हायला लागतो. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. थंडी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे हिवाळ्यात त्वचेवर ताण येऊन त्वचेवरची चमकही कमी होते. चेहऱ्यावरील या समस्या कमी करण्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त फेस वॉश आणि फेस पॅकचा वापर करत असतो. पण हे फेस वॉश आणि फेस पॅक आपल्या चेहऱ्याला हानी पोहोचू शकतात. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही हळदीचे (Turmeric) फेसपॅक सांगणार आहोत. ज्याच्या वापराने तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी बनेल.
हिवाळ्यामध्ये (Winter) चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी पुढील फेस पॅक वापरा
हळद आणि केळी
हिवाळ्यामधील त्वचेवरील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही हळद आणि केळीचा फेसपॅक बनवू शकतात. यासाठी तुम्हाला एक केळी आणि दोन ते तीन चिमूट हळद लागेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम केळीला मॅश करून त्यामध्ये हळद मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. तयार झालेली ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर साधारण दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. नियमितपणे या पॅकचा वापर केल्याने तुमच्या त्वचेला पोषण मिळून तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो.
हळद आणि चंदन
हळद आणि चंदनाचा फेसबुक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा बेसन, चिमूटभर हळद, दीड चमचा चंदन, पावडर दीड चमचा दूध या गोष्टी लागतील. चंदन आणि हळद यांचे फेसपॅक बनवण्यासाठी या सर्व गोष्टी एकत्र मिक्स करून घट्ट मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. यापेक्षा नियमित वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
हळद आणि बेसन
हळद आणि बेसनाचा फेस पॅक या हिवाळ्यामध्ये तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसन दीड चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे गुलाब जल लागेल. हळद आणि बेसनाचा फेस पॅक तयार करण्यासाठी हळद आणि बेसन मिक्स करून त्यामध्ये गुलाब जल मिसळून त्याची जाडसर पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर चेहरा व्यवस्थित साफ करून ही पेस्ट दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. नियमित या पॅकच्या वापराने चेहऱ्यावरील डाग कमी होऊ शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- ANIS | मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेची प्रतिक्रिया; म्हणाले,
- Pakisthan Army chief | लेफ्टनंट जनरल सय्यद आसिम मुनीर घेणार पाकिस्तान लष्कर प्रमुखाची जागा
- Sharad Pawar | “…तरच पुढची चर्चा होऊ शकते”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचे खडेबोल
- Udayanraje Bhosale | “पवार-गडकरींच्या जागी मी असतो तर…”; उदयनराजेंचा खोचक टोला
- Amit Shah | “ज्याने श्रद्धाची हत्या केलीये, त्याला…”, श्रद्धा वालकर हत्याकंडावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया