शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ‘कृषी प्रधान’ देश म्हटले जातात.
तुळशीचा चहा पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, तर मग घ्या जाणून…..
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लागवड कपाशीची होते. महाराष्ट्र हा अग्रेसर आहे. पण हा शेतकऱ्यांचे खूप हाल होतात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे परिणामी कापसाखालील क्षेत्र कमी होत ते सोयाबीनकडे वळण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे.
आठवडाभर विश्रांतीनंतर मॉन्सूनची वेगाने वाटचाल; देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल
आता सध्यातरी संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. त्यामध्येही शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करत पेरणी केली. पण पेरणी केल्यानंतर निकृष्ट दर्जाचे बियाणे उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. यवतमाळ जिल्ह्यात उगवणविषयक तब्बल 1500 पेक्षा अधिक तक्रारी करण्यात आल्या आहेत. यातील अर्ध्याअधीक तक्रारींची पडताळणीचे कामही झाले असून आता शेतकऱ्यांच्या डोळे भरपाईकडे लागले आहेत.
अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी ठोस तरतूद दिली गेली नाही – राजू शेट्टी
आतापर्यंत जिल्हयात सुमारे 1500 तक्रारींची नोंद झाली आहे. कृषी विभागाकडून यामधील तक्रारींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आता संबंधित बियाणे कंपनीशी चर्चा सुुुरु असून शेतकऱ्यांना बियाणे व मजूरीचा खर्च दयावा, असा आग्रह प्रशासनाचा आहे. परंतू ही भरपाई नेमकी कधी आणि कशा स्वरुपात मिळणार याबाबत मात्र अनिश्चीतता आहे. दुबार पेरणीपूर्वीच याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
शेताशिवाय व्यवसायाची इतर दालने खुली केली तर अर्थकारण बदलू शकेल – शरद पवार
बच्चू कडू अॅक्शन मोडमध्ये, वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवण्याचे दिले आदेश