शेतकऱ्यांच्या माध्यमातून सामान्यांना चिथावण्याचे, भडकवण्याचे काम केले जात आहे – संबित पात्रा

संबित पात्रा

नवी दिल्ली – कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर दिलेले आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हिंसाचार पसरवणाऱ्यांना सोडून द्यायची मागणी करत आहेत. हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती राहुल गांधी यांचे नातलग आहेत का? रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का? असे काही प्रश्न भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी हे दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधी आणि काँग्रेस आपल्या राजकारण करत आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून सामान्यांना चिथावण्याचे, भडकवण्याचे काम केले जात आहे, असा दावा संबित पात्रा यांनी यावेळी बोलताना केला.

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. “सरकार या समस्येचं निराकरण का करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचं निराकरण केलं गेलं पाहिजे. मी शेतकऱ्यांना चांगलं ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारलाच मागे हटावं लागेल,”असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होत.

महत्वाच्या बातम्या –