टीम महाराष्ट्र देशा: एड्स/एचआयव्ही (Aids/HIV) हा एक प्राणघातक आजार आहे. आज 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा केला केला जातो. या आजारावर आतापर्यंत कोणताही ठोस इलाज निघालेला आहे. एचआयव्ही लागण झालेल्या व्यक्तीला आयुष्यभर विषाणूची झुंज द्यावे लागते. या आजाराची गुंतागुंत कमी करण्यासाठी तज्ञांनी काही मार्ग सांगितले आहे. त्याचबरोबर या आजावर काही औषधी देखील उपलब्ध आहेत. एड्सबद्दल समाजात अनेक गैरसमज आणि चुकीची माहिती आहे. हे गैरसमज दूर करण्यासाठी आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एचआयव्हीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक एड्स दिवस दरवर्षीच्या जगभरात साजरा केला जातो. या आजारामध्ये रुग्णाचे आयुष्य कमी होतं मात्र पीडित व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, एड्सचा विषाणू सर्वप्रथम 19 व्या शतकात आफ्रिकेतील माकडांच्या एका विशेष प्रजातीमध्ये आढळून आला होता. एचआयव्हीची लागण सर्वप्रथम मानवामध्ये न होता प्राण्यांमध्ये झाली होती. हे बाधित माकड पाहिले एड्सचे रुग्ण मानले जाते. त्यानंतर लैंगिक संबंधातून एचआयव्ही जगातील अनेक ठिकाणी पसरला.
एड्स/एचआयव्हीबद्दल सर्व वयोगटातील आणि वर्गातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने WHO) 1987 मध्ये पहिल्यांदा जागतिक एड्स दिवस साजरा केला होता. दरवर्षी 1 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक एड्स दिवस दरवर्षी एक थीम निश्चित करून साजरा केला जातो. जागतिक एक दिवस 2022 ची थीम ‘समानता’ (Equalize) आहे. समानता या शब्दाचा अर्थ असा होतो की, समाजात पसरलेली विषमता दूर करून एड्सला मुळापासून नष्ट करण्यासाठी एकजुटीने काम करूया.
युनिसेफच्या मते बालक, किशोरवयीन मुले आणि गर्भवती महिलांसाठी एचआयव्ही उपचार आणि प्रतिबंधांमध्ये गेल्या तीन वर्षात कोणतीही प्रगती झालेली नाही. युनिसेफने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये सुमारे 1 लाख 10 हजार बालक आणि किशोरवयीन (0-19 वयवर्ष) एड्स संबंधित कारणामुळे मरण पावले आहेत. तर 3 लाख 10 हजार नवीन संक्रमित झाले आहे. त्याचबरोबर एचआयव्हीग्रस्त तरुणांची संख्या आता 2.6 दशलक्षावर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | “आता अस्वस्थ असलेले मुख्यमंत्री दारोदार…”, अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला
- Udayanraje Bhosale | “एवढी मोठी घोडचूक केली आहे, तरीही एखादा निर्लज्जच…”, उदयनराजे भोसले कडाडले
- Cabinet expansion | मंत्रिमंडळ विस्तारात नितेश राणे, रवी राणा, बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार?
- BJP | “जर पुरावे दिले नाही तर आदित्य ठाकरे यांचे तोंड…”; भाजपच्या ‘या’ नेत्यांचा इशारा
- Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांनी शिवप्रतापदिनी अनुपस्थित राहण्याचं कारण केलं स्पष्ट, म्हणाले…