चिंताजनक! जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

कोरोना

पुणे – एप्रिल महिन्यात पुण्यातील स्थिती ही गंभीर बनली होती. दिवसाला सुमारे ७ ते ८ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद एकट्या पुणे जिल्ह्यात केली गेली. यानंतर मे महिन्याच्या अखेरीस दुसरी लाट ओसरू लागली. सध्या दररोज सरासरी २०० ते ४०० कोरोना रुग्णांची नोंद पुणे जिल्ह्यात केली जात आहे.

कोरोना संसर्ग हा कायम असून हा रोग पूर्णपणे नष्ट होईपर्यंत संकट हे कायम आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात पुणे जिल्ह्यात ३३३ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७६ हजार २३५ झाली आहे. तर गेल्या २४ तासात पुणे जिल्ह्यात २५६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या आता ४ लाख ८७ हजार ४२१ इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात  एकाच दिवसात ६ हजार ६१७ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ८७ हजार ९०६ इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ४१२ रुग्णांपैकी २२१ रुग्ण गंभीर तर ३४१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७७४ इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –