चिंताजनक! राज्यात गेल्या २४ तासात डेल्टा प्लस आढळले तब्बल ‘इतके’ रुग्ण

कोरोना

मुंबई – कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

तर राज्यात काल सोमवारी (दि. २३) आणखी २७ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली. यामध्ये अमरावती व गडचिरोली येथे प्रत्येकी ६, नागपूर ५, अहमदनगर ४, यवतमाळ ३, नाशिक २ आणि भंडारा १ यांचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या १०३ एवढी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –